इथ ज्या ज्या वेळेला काही घडत असतं, त्यावेळी सगळंच शंकास्पद वाटतंय. गरीब असतो तो तळमळून मरतो पण त्याला न्यायच मिळत नाही. कितीतरी खून होतात, बलात्कार होतात, हत्याकांड होतात, दंगली होतात नंतर नंतर ते सगळं पुसट होतं जातं. आपनही (जनता) सगळ विसरून जातो आणि ब्रेकिंग न्युज वर जोक, आलेले इमोशनल मेसेज फाॅरवर्ड करून दाखवण्यासाठी दुःखी अथवा सुखी होतो. पण त्यातलं शेवटपर्यंत कधीच काहीच राहत नाही आणि त्यावर कुणाला विचार करावा वाटत नाही हे एक दूर्दैव.
ज्या ठिकाणी समान संधीच्या गोष्टी होतात किंवा असतात, तिथंच त्या समानाचा गळा घोटला जातो. आणि चिमुटभर बलाढ्य लोकांच्याच हातंची बाहुली ही व्यवस्था होते. त्यावेळी समान संधी/हक्क मिळायची व्यवस्था मरते. मग सर्वत्र न्युट्र्यालिटी येते. मोठ्ठा अधिक मोठ्ठाच होतो लहान अथवा गरीब हा अधिकच गरीब होवून कधीतर नष्ट होतो.
चिवट झुंज देतो तो मध्यमवर्गीय होतो. आत्ताच्या या व्यवस्थेतल्या चाणक्यांना मध्यमवर्गीय हे अतिप्रिय. हेच मध्यमवर्गीय मिटक्या मारत जोक फाॅरवर्ड करत बसतात. अर्थात ती त्यांची चुक नाहीच. त्यांचा तो विरंगुळा आहे. कधीकधी लहान मोठे उद्रेक होतात त्यावेळी रस्त्यावर कोण असतात ?
त्यांना रस्त्यावर नेणेही आणि समर्थनार्थ अथवा विरोधात घोषना द्यायला लावणारे असतात हे यांना कळत नाही. ह्यांना आपलेच अप्रिम कौतुक. हे बनावट असतं हे सांगणार तरी कोण ?
वापरून झाल्यावर बांधून ठेवणे. पाहिजे त्यावेळी गर्दीला रस्त्यावर नेणे आणि पाहिजे त्यावेळेस तिला कोंडून ठेवणे हे आत्ता होतंय. हे वाईट आहे. समर्थनार्थ गर्दी उतरवून व्यवस्थेत उतरल्यानंतर त्या गर्दीची ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी ती आक्रमक न होता केलेल्या समर्थनाची लाज वाटून ती शरमिंदी होते. त्यावेळी एकाधिकारशाही अथवा हुकूमशाहीची सूरवात असते. हे जाणवायला वेळ लागतो आणै आपन वर्षानुवर्षे अधिकच अआंधळे होतो.
सन्मानाने पोट भरत नसते.
समान संधी दिसायला असतात किंवा मानायला असतात. कर्तृत्वान असतो तो पुढे येतो हे जगजाहिर असतं. तो पुढे येतो त्याचा स्तर ऊंचावतो हे मान्य. पण तो कुणाच्या छत्रछायेखाली पहुडतो ? कुणाचा गुलाम होतो हे त्यालाही ठावूक नसतं.
अशा परिस्थितीत मोटिव्हेशनल आणि इंटरप्रेनिंगचं प्लॅस्टीक युग चालू होतं. मग सलमान सूटला की जल्लोषाचे निर्लज्ज तमाशे सूरू होतात.
10 december 2015

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा