गेले काही दिवस नाशिक जिल्ह्यातील मांगीतूंगी येथे भगवान ऋषभदेव यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा चालू आहे.
मुर्ती भव्य म्हणजे एकशे आठ फूट ऊंचीची आहे. एकोणीस वर्षापासून त्यावर काम चालू आहे. गिनीज बुकवाले याची नोंद घेणार असल्याचे ऐकिवात आहे.
जैन धर्म जूना. या धर्माने अहिंसा , अनेकांतवाद, भूतदया असे अनेक तत्वज्ञान दिले आहेत. आजही जागोजागी देशोदेशी अहिंसेचे पूजारी हारखून जावून गांधी मंडेला ई लोकांच्या पूतळ्यांचे, संग्रहालयाचे उदघाटन नुतनीकरण जोरात चालू आहे. कुणाला हिंसा पाहीजे आहे?
कालपरत्वे घडलेल्या बदलात जैन समाज वाहत गेला आणि आजतारखेला धर्मतत्वज्ञानाचा अभ्यास करताना संदर्भ ताडून पाहिले तर तत्वज्ञानाचा आणि आपला काडीमात्र संबंध नाही अशा पातळीपर्यंत अधोगती झालेली प्रकर्षाने जाणवते. फक्त श्रीमंतीचे सोहळे इथे साजरे व्हावयास सुरवात झाली. यापलिकडे आज तिथे काहीही नाही. मुर्तीपूजा मुळात नव्हतीच. आज ती परिस्थिती नाही. जिकडे जाल तिथे फटफटीत मूर्त्या आणि बसत्या. बरं ते राहिले तर त्या मुर्तींच्या पूजेचा मान खिशात लाखोकरोडो रूपये असणार्यास. अलिकडचे कडवे प्रवचन देणारे राष्ट्रसंतही (?) त्यातलेच ! पंचवीस हजाराचे मानधन देणार्यांकडेच हे भोजन करायचे. अजूनही तेच करतात.
सांगायचा मुद्दा असा कि , गेल्यावर्षातल्या तीन घटना आपल्या डोळ्यासमोर आहेत. एका गृहस्थास तो मांसाहार करतो म्हणून या लोकांनी त्यांचेवर हल्ला केला. दूसरी घटना अशी की पर्युषन पर्व काळात मांसाहारी दूकाने बंद ठेवावी असा फतवा. तिसरी घटना अशी राजस्थान न्यायालयाने संथारा (सल्लेखना) वर बंदी घालण्याचा काढलेला आदेश. आणि त्याविरूद्ध सर्व राज्यात केलेले आंदोलन.
ह्या तीनही घटना निराळ्या असल्या तरी त्यात कुठेतर एकसूत्रता जाणवते. ज्यावेळी मांसाहार करणार्या गृहस्थावर हल्ला होतो. त्यावेळी अहिंसा कुठे जाते ? इथे लोकशाही आहे. कुणी काय खावे, ल्यावे, प्यावे संचारावे यावर कुणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यातही यांचा युक्तीवाद असा की परस्परांच्या भावनेचा आदर करावा. हे जर असे तर राज्यात आज काय परिस्थिती चालु आहे ? भयंकर दूष्काळाच्या सावटाखाली राज्य आहे. अशा परिस्थितीत आपले करंटे राज्यसरकार तरी शहाणे असावे. ते ही नाही. उलट या लोकांनी इथे कोट्यावधी रूपयांचा निधी देण्याचे पराक्रम केलेच आणि तिकडे चाराछावण्या बंद पाडायचे. त्यानुसार ते चालू आहे. इथे संवेदनशीलता कुठे जाये ?
तिसरी घटना अशी की सल्लेखना म्हणजेच जिवंत समाधी ! ह्या गोष्टीचा आज काय उपयोग होतोय ? हे ऐकाल तर थक्क व्हाल. एखादा वृद्ध व्यक्ती आजारी पडला की त्यास हे व्रत देवून विनाजेवण पाणी अखंड जप करत त्यास समाधी दिली जाते. गेल्याच वर्षी अरूणा शानबाग गेलो. तिला इच्छामरण मिळाले नाही. भयंकर वेदनाग्रस्त जीवन ती जगली. न्यायपालिकेने मात्र इच्छामरणाच्या याचिका फेटेळल्या. इथे राजस्थान उच्च न्यायालयाने सल्लेखना वर बंदी आणायचे आदेश काढले आणि त्याविरूद्ध आंदोलन झाल्यावर ते बारगळले.
जिथं माणसाचं क्षणाक्षणाचे विचार बदलत असतात तिथे एखाद्यास असे व्रत देणे हे हत्या करण्याजोगेच !
लाखोकरोडांच्या बोलीतून पूजेचे मानकरी सवाल विकून, लाखो लिटर पाणी फळांचा रस यांचा अपव्यव करून कोणत्या दिशेने समाज वाटचाल करतोय ? अहिंसा इतकी बोथट झालेली आहे का ?याचा विचार करणे या समयी क्रमप्राप्त ठरत आहे.
सोईस्कर पंथी तत्वज्ञान मांडून श्रीमंतीचे आचरट सोहळे करणार्यास त्यांचा मोक्ष मुबारक !
_

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा