सचिन तेंडूलकर हा क्रिकेटचा बादशहा. पहिली मॅच झिरो वर बाद होऊन हा मोठ्ठा झाला. ते आजपर्यंत ह्याच्या नावाच्या अनेक कथा. संयमी खेळाडू ते क्रिकेटचा देव ई. आम्हाला हे त्याचे महानपण मान्य आहे. क्रिकेट हा मूळचा आपला खेळ नाही हेही मान्य. परकीय आहे, किंवा इंग्रजाचा वगैरे अशा अनेक समजूती आपन करून घेतलेल्या. घेतलेल्या या इतक्यासाठी की आज गल्ली ते दिल्ली हा खेळ इतका लोकप्रिय आहे की त्याची सुरस कवणे ऐकून आमचे कान धन्य झाले आहेत. अशा प्रसंगी एकशेपंचवीस कोटी लोकसंख्येत तसे तेहतीस कोटी आणि त्यावर जिवंत देव म्हणून एक सचिन तेंडूलकर. म्हातारे कोतारे ते पहीली दूसरीचे बालक वर्ग त्यांचा चाहता. त्यात गैर काही नाही.
हेच माननीय भारतरत्न सचिन तेंडूलकर जेव्हा भारतीय संसदेचे सदस्य झाले. राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हां संपूर्ण भारतवर्ष हे त्यांच्याकडे डोळे लावून देव काय करेल ?
असा विचार करत होते. तेव्हां ह्या भक्त लोकांच्या पदरात काय पडले ? ह्याचा विचार बरेचदा आम्हाला छळत असतो. साहित्यिक, खेळाडू, विचारवंत, संशोधक यांसाठी राज्यसभेच्या काही राखीव जागा असतात. तर हे जिथून आले त्या क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडविण्यास मदत म्हणून आपले सरकार या लोकांकडे अनुभवजन्य मदत मागत असते. मागत असते अर्थी त्या लोकांनी तिथल्या समस्या बदल्यात काही उपाय सूचवावेत ही किरकोळ गोष्ट. त्यात हे भारतरत्न म्हणजे दांडगे अनुभवी. चार कर्णधार बदलले पण हे संघात राहीले, त्या अर्थी अनुभव दांडगा. प्रमूखापेक्षा कार्यकर्त्यासच अडचणी दांडग्या. त्याप्रसंगी बरेच चेंडूफळीवाले तरी मनात आशा धरून होते. हा देव काही चमत्कार करेल आणि आमचे कौशल्य कुठेतरी देशासाठी फळाला येईल. ही भाबड्या चंडूफळीवाल्यांची अपेक्षा. ते झालेच नाही.
हे सचिन तेंडूलकरही तेच जे काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सौभाग्यवतीनी जिथून चमत्काराने सोनसाखळी पैदा केली, तसेच एक जादूगार सत्यसाईबाबा यांचे शिष्य होते. तिथून त्यांनी आंगठी पैदा केली होती. असो.
भारतीय विधानभवन म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा हे वरिष्ठ. बाकी लोकसभा ही द्वितीय. जनतेने निवडलेले लोक लोकसभेत असतात. तर राज्यसभेत बुद्धीमान लोक असतात. उदा स्मृती इराणी, अरूण जेटली ई.
तिथे ह्या सचिन तेंडूलकराना काँग्रेस पक्षाने खासदारकीची वस्त्रे चढवून वाजत गाजत राज्यसभेत पेश केले. तसे ह्या काँग्रेसवाल्याना किंवा भाजपवाल्यांना अशातही विक्रम करायची चक्रम सवय असते हे मान्य. पण स्वतःचे जगभर चाहते असणारे लोक ज्यावेळी अशा सभागृहात जातात त्यावेळेस त्या लोकांस एक संधी चालून आलेली असते. त्याचा वापर करणारा एकही हिरा आजतागायत सापडावा तर त्यास सोन्यात मढवले असते. पण इथे सगळे काळे कोळसेच.
आता इथे चर्चेत कुणीतरी मुद्दा काढेल की, सचिनने इथे इतके पैसे दिले, अबक हे गाव सुधारले. तिथे पायाभूत सोईसुविधा वगैरे कशा पुरविल्या याच्या कान विटेस्तोवर कहाण्या सुनावल्या जातील. हे नवे नाही. पण ज्या कामासाठी आपनास या सभागृहाची पदे बहाल केली त्याचं आपन काय केलात ? या प्रश्नाचं जर प्रामाणिक उत्तर शोधलं तर हाती काय मिळतं ?
सचिन हे प्रातिनिधिक इतरांचे काय ?
इथून जनतेतून निवडूण गेलेल्यांचे दिवे तर कुठं उजळत आहेत ?
हे एकदा गंभीररित्या या भारतवासियांनी पाहीले पाहीजे.
तसेच हिमंती खेळाडूनी देखील आपल्या नाकर्तेपणाची नोंद घेवून पंचानी निर्णय देण्याअगोदर बाहेर झालं तर बरे होणार नाही का ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा