सिंधूताई सपकाळ यांच्याविषयी काल दोन ओळी लिहल. आणि नंतर तिथं बरेच वाद झाले. त्याप्रसंगी सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे कर्तव्य आहे. सर्वप्रथम ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांची माफी मागतो आहे त्यांनी माफ करून टाकावं.
आता आमचे म्हणने काय आहे ते थोडक्यात सांगावयाचे काम करतो.
मला इतर देशांचं माहित नाही, भारतातल्या लोकांच एक असं आहे की त्याला बरेच आदर्श असतात. बहूतेकदा हे आदर्श छोट्या अनाथ लोकांसाठी काम केलेले. किंवा शुन्यातून आपलं विश्व ऊभारणारे. असं असतं. नंतर आपन त्या आदर्शास देवत्व बहाल करतो. त्याच्यानंतर आपन सर्वच ठिकाणी संबंधीत प्रेमामुळे आपन ती व्यक्ती ऐकत असतो. त्यात प्रेमामुळे आपली मत बनविन्यावर मर्यादा येतात असे मला प्रामाणिकतः वाटते.
त्यावेळी आपन त्या व्यक्तीचं सगळं कसं बरोबर हे पटवून घेतो आणि देतो.
हे सगळं नैसर्गिकता आहे. दोन लोक लढाया समोर करणारे दिसले की कुणा एकावर आपली मर्जी बसते आणि ती जिंकावी असं आपलं मन चिअर्स करत. हे स्वाभाविक आहे.
तसं होतं बरेचदा. यात आपन तटस्थबुद्धी हरपून जातो. आणि पुढं बोलणारी कुठल्याही मुद्दयावर भांडण असताना त्यावेळी बचावात्मक पवित्रा घेताना आपन हळव्या बाजूंची ढाल पूढे करतो.
आज एका उत्तुंग ठिकाणाला आपला देश आहे. मनुष्यबळ जादा आहे. ऊंची उडाण घेतो आहे. प्रगतीची नांदी आहे. असे असताना देशांतर्गत अडीअडचणी आहेत याकडे दूर्लक्ष करता कामा नये. या अडचणी कशातून उद्भल्या याचा शोध घेणे या प्रसंगी उचित वाटते. अडाणी पेक्षा अज्ञानी पणा जबाबदार आहे. अज्ञानी यासाठी की आजरोजी इथल्या शिकलेल्या लोकांस सूज्ञपणाची अक्कल नाही, तिथे संवेदना हरवून अप्पलपोटी स्वभावाची निर्मिती झाली आहे. यांस आजूबाजूची परिस्थिती जबाबदार आहे. त्यात स्वत्व टिकवून ठेवणे कुणास जमनार ? त्यासाठी तालावर नाचणे बंद करावे लागते. शोधावं लागतं स्वतःच काही. त्यास कष्ट म्हणटल जातं.
हे लक्षात घ्यायला खूप वेळ जावा लागतो. पण लक्षात आल्याच्यानंतर आपली मोठी अडचण ही की आतापर्यंतचं सगळं भंपक होतं ? हे लक्षात आलं की आपली आपनास लाज वाटते आणि इथून अधोगती ताबा घेते. जीर्ण उतरावयाला आपन तयार नाही आहोत ही मोठी अडचण आहे. इथ नैतिक कसोशी लागते, कमालीचा निगरगट्टपणा लागतो. किमान ऐकायची ताकद लागते. असे हे. त्यामुळे फारतर आपन त्याकडे दूर्लक्ष करण्यावाचून काही करू शकत नाही. आणि इथ फसतो आपन.
सिंधूताई सपकाळ यांना दोनदा ऐकायचा प्रसंग आला. त्यांचे कार्य अगाध आहे, त्याबद्दल शंकेला वाव नाही. त्यांचा प्रवास मोठा आहे. आक्षेप फक्त भाषनावर आहे. हे लक्षात घ्यावं. दूसर्या एक एॅड. अपर्णा रामतिर्थकर त्यांच सूद्धा कार्य मोठ्ठं. त्या वकिल आहेत.
वर्षानुवर्षे स्त्री घरात राहीली. ती आत्ता कुठे बाहेर येत आहे. समाजाच्या पटलावर कार्य करताना दिसत आहे. खोट्या नैतिकतेचा बूरखा फाडून क्षमता सिद्ध करू पहात आहे. त्याप्रसंगी मला या दोन समाजसेविकांच्या वकत्व्यावर आक्षेप घ्यावा वाटतो. आपल्यापैकी किती लोकांनी त्यांना ऐकले ठाऊक नाही. सतत जाणवतं कि कुठेतर यांचं चुकत. बर शहराच ठिक आहे. खेड्यातल्या स्त्री वर्गास त्या पटून जातात मग तिथं काय करणार ? खरं काय ? खोटं काय ? हे ग्रामिण स्त्रीला कोण सांगणार ?
व्यकतीस्वातंत्र्य प्रत्येकास आहे. म्हणून आपन काय बोलावे काय नको. याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. ते तसे होताना दिसत नाही. याचे वाईट वाटते. समाजमनाने एकदा इकडंही पाहिलं पाहीजे. नाहीतर 'शील' आपनाला आवडतं. तसं 'विकसनशील' ही उशीरा आवडत राहील. smile emoticon

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा