मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

सचिन आणि भारत देश .....


सचिन तेंडूलकर हा क्रिकेटचा बादशहा. पहिली मॅच झिरो वर बाद होऊन हा मोठ्ठा झाला. ते आजपर्यंत ह्याच्या नावाच्या अनेक कथा. संयमी खेळाडू ते क्रिकेटचा देव ई. आम्हाला हे त्याचे महानपण मान्य आहे. क्रिकेट हा मूळचा आपला खेळ नाही हेही मान्य. परकीय आहे, किंवा इंग्रजाचा वगैरे अशा अनेक समजूती आपन करून घेतलेल्या. घेतलेल्या या इतक्यासाठी की आज गल्ली ते दिल्ली हा खेळ इतका लोकप्रिय आहे की त्याची सुरस कवणे ऐकून आमचे कान धन्य झाले आहेत. अशा प्रसंगी एकशेपंचवीस कोटी लोकसंख्येत तसे तेहतीस कोटी आणि त्यावर जिवंत देव म्हणून एक सचिन तेंडूलकर. म्हातारे कोतारे ते पहीली दूसरीचे बालक वर्ग त्यांचा चाहता. त्यात गैर काही नाही.
हेच माननीय भारतरत्न सचिन तेंडूलकर जेव्हा भारतीय संसदेचे सदस्य झाले. राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हां संपूर्ण भारतवर्ष हे त्यांच्याकडे डोळे लावून देव काय करेल ?
असा विचार करत होते. तेव्हां ह्या भक्त लोकांच्या पदरात काय पडले ? ह्याचा विचार बरेचदा आम्हाला छळत असतो. साहित्यिक, खेळाडू, विचारवंत, संशोधक यांसाठी राज्यसभेच्या काही राखीव जागा असतात. तर हे जिथून आले त्या क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडविण्यास मदत म्हणून आपले सरकार या लोकांकडे अनुभवजन्य मदत मागत असते. मागत असते अर्थी त्या लोकांनी तिथल्या समस्या बदल्यात काही उपाय सूचवावेत ही किरकोळ गोष्ट. त्यात हे भारतरत्न म्हणजे दांडगे अनुभवी. चार कर्णधार बदलले पण हे संघात राहीले, त्या अर्थी अनुभव दांडगा. प्रमूखापेक्षा कार्यकर्त्यासच अडचणी दांडग्या. त्याप्रसंगी बरेच चेंडूफळीवाले तरी मनात आशा धरून होते. हा देव काही चमत्कार करेल आणि आमचे कौशल्य कुठेतरी देशासाठी फळाला येईल. ही भाबड्या चंडूफळीवाल्यांची अपेक्षा. ते झालेच नाही.
हे सचिन तेंडूलकरही तेच जे काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सौभाग्यवतीनी जिथून चमत्काराने सोनसाखळी पैदा केली, तसेच एक जादूगार सत्यसाईबाबा यांचे शिष्य होते. तिथून त्यांनी आंगठी पैदा केली होती. असो.
भारतीय विधानभवन म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. राज्यसभा हे वरिष्ठ. बाकी लोकसभा ही द्वितीय. जनतेने निवडलेले लोक लोकसभेत असतात. तर राज्यसभेत बुद्धीमान लोक असतात. उदा स्मृती इराणी, अरूण जेटली ई.
तिथे ह्या सचिन तेंडूलकराना काँग्रेस पक्षाने खासदारकीची वस्त्रे चढवून वाजत गाजत राज्यसभेत पेश केले. तसे ह्या काँग्रेसवाल्याना किंवा भाजपवाल्यांना अशातही विक्रम करायची चक्रम सवय असते हे मान्य. पण स्वतःचे जगभर चाहते असणारे लोक ज्यावेळी अशा सभागृहात जातात त्यावेळेस त्या लोकांस एक संधी चालून आलेली असते. त्याचा वापर करणारा एकही हिरा आजतागायत सापडावा तर त्यास सोन्यात मढवले असते. पण इथे सगळे काळे कोळसेच.
आता इथे चर्चेत कुणीतरी मुद्दा काढेल की, सचिनने इथे इतके पैसे दिले, अबक हे गाव सुधारले. तिथे पायाभूत सोईसुविधा वगैरे कशा पुरविल्या याच्या कान विटेस्तोवर कहाण्या सुनावल्या जातील. हे नवे नाही. पण ज्या कामासाठी आपनास या सभागृहाची पदे बहाल केली त्याचं आपन काय केलात ? या प्रश्नाचं जर प्रामाणिक उत्तर शोधलं तर हाती काय मिळतं ?
सचिन हे प्रातिनिधिक इतरांचे काय ?
इथून जनतेतून निवडूण गेलेल्यांचे दिवे तर कुठं उजळत आहेत ?
हे एकदा गंभीररित्या या भारतवासियांनी पाहीले पाहीजे.
तसेच हिमंती खेळाडूनी देखील आपल्या नाकर्तेपणाची नोंद घेवून पंचानी निर्णय देण्याअगोदर बाहेर झालं तर बरे होणार नाही का ?
झालंय कसं माहितंय. 1991 ते 2008 पर्यंत मोठ्या प्रमाणात गर्भपात (स्त्रीभ्रुणहत्या) झालेत. त्यामुळे या काळात सरासरी 130 दरहजारी कमी मुली आहेत. किंवा त्यापेक्षा कमी. आत्ता ती पिढी लग्नवयाला आलीये. आणि साहजिकच मुली कमी असल्याने कर्नाटकात स्थळ बघायला चाललेत. आंतरजातीय लग्न व्हायलेत. कोण कूणाला इतकं काही बोलेनात, किंवा आंतरजातीय लग्नाला फारसा विरोध होत नाही. हूंडा वगैरे लांबचं. लोक शहाणे झालेत.
इथं जगताना......
भारत देश विवीध समूहांच्या धर्माजातीनी बनलेला देश आहे. त्यात बहूसंख्याक, अल्पसंख्याक ही वर्गवारी. त्याच्यानंतर एकाच धर्माच्या अनेक पोटजाती. त्यांच्या विवीध चालीरीतीरूढी. 
धर्म ही पूरातन संकल्पना आहे. तिचा शोध लावणारा त्या काळात भल्यासाठीच लावला असेल. कुठेतरी एकोपा नांदेल या दृष्टीकोनातून. जून्या गोष्टी गेल्या किंवा जात राहिल्या. परंतु धर्मजात ही गोष्ट काही केल्या गेली नाही. तिचं उद्दातीकरण, किंवा नवनव्या संकल्पना येत राहिल्या. ज्या धर्मात मुर्तिपुजा वर्ज्य होती, त्याही मुर्तीपूजेकडे धर्म टिकविण्याच्या भावनेने वळल्या. अर्थात आपल्याला धर्माच्या तत्वज्ञानाशी काही देणघेणं नसतं. त्याच मुळ अज्ञानात आहे. देव सूरवातीला झाले. (म्हणजे ते असतील वा नसतील.) 
त्याचं नवं रूप जे आपल्याकडं आलं ते भयंकर आणि तितकच भंपक. हाडामांसाच्या माणसानी ज्यांनी इथं घरावर तुळशीपत्र ठेवून समस्त जनकल्याणार्थ कार्य केलं. ती व्यक्ती सर्वांसाठी कार्य करते आहे हे विसरून त्याला आपल्या धर्मात अथवा जातीत बंदिस्त केल्यानं त्या महापूरषाबद्दल मर्यादा आणण्याचं पद्धतशीर काम झालं. एका जातीधर्माइतकीच त्याची मर्यादा झाली. त्यातून त्याच्या इतर पैलूंचे आकलन होण्यास मर्यादा आल्या हे मान्य करावे लागते. 
आज प्रगतिच्या वा विकासाच्या वाटेवरून जग आगेकूच करत असताना आपल्या धार्मिक भावनाही तितक्याच प्रखर बनत चालल्या आहेत. यात कुणीच मागे नाही. माणसांनी इथं जी आधूनिक क्रांति केली ती इंटरनेट, इलेक्ट्रानिक माध्यम यावरूनही देवाधिकांचा प्रसार चालु असतो अविरतपणे. यास मुर्खपणा म्हणायचा की आणखी काय ? असे बरेच प्रश्न येताहेत. 
ज्यासमयी या राष्ट्रात राजेशाही होती तेव्हां इथे धर्माधिष्ठीता गैरलागू होती, कलागुण, बुद्धिवंत असणारा माणूस त्याची हूशारी दाखवून राजाच्या दरबारातली मानाची पदं मिळवत होता. त्यावेळेस जात्यंधता नव्हती, जे जे कल्याणकारी असेल ते ते राज्य पुढे जाण्यास उपयोगात आणले जायचे. त्यावेळेस कुठला भेद आणि कुठला सेक्युल्यारिझम ? 
असं काहीही नव्हतं. परंतू नंतरच्या काळात आपापल्या सोईने जसे होईल तसे त्या ईतिहासकाराने मांडावयाचे चाळे केले. त्यात आम्हा भारतीयाना एक नायक आणि एक खलनायक राम रावणापासून सिंघम जयंकांत शिकरे पर्यंत लागतो. मनोरंजनाचे ठिक. परंतू ईतिहासात जो अतिरंजितपणा आलेला आहे त्याने ईतिहासाकडे बघण्याची तटस्थवृती आपन हरवून बसलेलो आहेत. या रंजनाच्या मोहापायीच ईतिहासामुळे उन्मादित उद्दामपणा पावलोपावली ठसला गेलाय. वरतून त्या नायकांना जातीधर्माच्या तबेल्यात डांबलं गेलं. त्या धर्मजातीचा तो त्याचा अनुयायी असे होत गेले. परधर्मजातीचा तो शत्रु हे कुठतरी बिंबवल किंवा बिंबल गेलं. यातूनच आजपर्यंत बरेच संघर्ष उदभवले आणि उदभवताहेत. 
................................................
शेवट :
आजघडीला या देशातून, जगातून देवधर्म हद्दपार करणे. ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही. आपला मेंदू विकसित झालाय. तटस्थपणे, कोणताही अंह मनात न आणता एखाद्या गोष्टीकडे बघण्याची सवय लागली पाहीजे. यातूनच जिज्ञासूवृत्ती वाढते. जाणिवा समृद्ध होतात. कुठल्याच मर्यादा न पाळता केलेलं काम हे समाधान देणारं आहे. जग जवळ आलंय. कित्येक नव्या गोष्टीचे आदानप्रदान होऊ शकते. जे आपल्याला समृद्धीकडे नेत असते. आपलं कुठं चूकतंय किंवा दूसर्याच बघून आपणास काय सूधारणा करता येवू शकतात ह्या आता बघणे आपल्या हातात आहे. द्वेषबूद्धीने मेंदू मंद पडतो. जरी देवधर्म हद्दपार होणार नसतील तरी आपन एकमेकाच्या भावनांचा आदर करण्याइतके निश्चित प्रगल्भ झालोय. ह्या अशाच मार्गाने गेलो तर एकदिवस देवधर्म ही शेपटी सारखे गळून पडतील. बदल घडवला पाहीजे.
राज्यात जेव्हां राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार होते तेव्हा जलसंपदा विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. सत्तेत असताना, सुनिल तटकरे, अजित पवार यांच्याकडे हे पद होते, आणि शेवटीशेवटी हसन मुश्रीफ यांच्याकडे हे पद होते.
या सरकारच्या काळात अनेक मोठे सिंचन प्रकल्प झाले. होत होते.
'आदर्श' घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेवर आरोप झालेनंतर त्यांचा राजीनामा घेवून काँग्रेस पक्षाने दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात काम पाहणारे पृथ्वीराज चव्हाण यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले. दरम्यान राज्यात जिल्हापरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुका लागल्या. चव्हाण नवे होते. या निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत मते मिळवत पहीला क्रमांक घेतला आणि पृथ्वीराज चव्हाण अस्वस्थ झाले. मुद्दामहून कामाच्या फायली रोखून धरण्याचा सपाटा लावला. तो इतका की खुद्द शरद पवारांनाही चव्हाणांच्या हाताला लकवा भरलाय की काय ? असं वक्तव्य करावयास भाग पाडलं.
तिथून राष्ट्रवादी विरूद्ध इतर सगळे पक्ष असं समिकरणच राज्यात तयार झालं. याच पृथ्वीराज चव्हाणानी सिंचनावर एवढा खर्च होवूनही फक्त एक टक्के च सिंचन झालं असा आरोप केला. त्याच्याच नंतर विद्यमान मंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, किरीट सोमय्या, विनोद तावडे, रावसाहेब दानवे. शिवसेनेचे रावते व अभियंता विजय पांढरे (हे तेच आम आदमी पार्टीचे ! ) इ लोकांनी सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटी रूपयांचा झाला असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीवर लावला. त्यानंतर राज्यभर याच चर्चेला औत आला. त्यावेळी ऐन दूष्काळ होता. त्याप्रसंगी चाराछावनी टँकरने पाणीपूरवठा ईत्यादी उपक्रम हाती घेतले गेलेते आणि ते सूरळीत चालू होते परंतू इथे अजित पवारांना विरोधी पक्षानी आणि माध्यमांनी गप्प बस दिलं नाही. त्या त्रासाला आणि आरोपाला उत्तर म्हणून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपदाचा राजिनामा मुख्यमंत्र्याकडे सोपवला आणि ते सत्तेतून बाहेर पडले. याच्याचनंतर जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका काढण्याच काम अधिकार्यांमार्फत चालु झालं. त्या काळात अजित पवारांवर मोठ्ठा दबाव होता. अकोले तालूक्यातील पिचड यांच्या मतदारसंघात निळवंडे कालव्याच भूमिपूजनही केलं. त्याप्रसंगी केंद्रात काँग्रेसवर कोळसा खाण घोटाळा, टू जी स्कॅम, इत्यादी वर आरोप होवून अक्षरशा मनमोहन सरकार हैराण होतं. त्यातच इकडे महाराष्ट्रात हा घोटाळा झाल्याच्या बातमीनं देशातील वारे फिरले. केंद्रसरकार, मुख्यमंत्री, विरोधीपक्ष, माध्यमं ह्यानी फक्त अजित पवाराना टार्गेट केलं. दोन महिन्यानी श्वेतपत्रिका आली. ती वाचायची तसदीही न घेता त्यावेळी दूष्काळाचं राजकारण भाजप शिवसेने मनसेने केलं. परिणामी राष्ट्रवादीला लोकसभेत मोठ्ठा धक्का बसला. काँग्रेसलाही पाप फेडावं लागलं. काँग्रेसही भूईसपाट झाली राज्यात. भाजपच सरकार बहूमतानं केंद्रात आलं. लगेच विधानसभा लागली. चारही पक्ष स्वबळावर लढले. मोदी लाटेचा प्रभाव अजून होता. त्यात काँग्रेस राष्ट्रवादी परत नेस्तनाबूत झाली. सत्तेच्या काठावर भाजप येवून ठेपला. बर्याच अंकानंतर शिवसेनेशी यूती झाली.
सत्तेवर आल्यावरही फडणवीसानी राजकारण तसंच सूरू ठेवलं. जलयुक्त शिवार ही संकल्पना आणली. यातून काय तर फक्त शेततळे होईल. आणि पावसाचे पाणी साचून राहील ही व्यवस्था. या पल्याड याचे काही फारसे नावाजण्याजोगे काम नव्हते. भाजपची यंत्रणा ही प्रचारकी आहे हे इथे नमूद करावे वाटते. पावसाळ्यात ते फोटो पाहीले की वाटायचे की काय अचाट प्रगति केलीय या सरकारने ! हे सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून हाच समज होतो. एकीकडे कितीतर कोटी रूपये खर्चून थोडंच पाणी आणि इथं मात्र अल्प खर्चात पाणीच पाणी ! असा एक दृष्टीकोन तयार होण्यात या प्रचारकी भाजप पक्षाने यश साधले. मात्र आज त्या जलयुक्त शिवारच्या खड्ड्यात जनावरांस तरी पाणी आहे का ? नाही. फक्त राजकारण केलं गेलं जलयुक्त शिवार योजनेचं. यातून आधीच्या लोकांविरूद्ध जनतेची मतं बनविन्यात भाजपला यश आलं.
पावसाळ्याचे महिने गेले. अजून तसा हिवाळाच. गेले दोन महिने मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. विदर्भ मराठवाड्यातला ऊसाचा गळीत हंगामही संपला. पश्चिम महाराष्ट्रात थोडी परिस्थिती बरी मातूर पावसाचे प्रमाण कमीच. धरणात जलसाठा कमी आहे. अशा प्रसंगी गेले काही दिवस चालु असलेल्या चाराछावण्या बंद करण्याचा पराक्रम जिल्हाधिकार्याने केलाय. हे जिल्हाधिकारी आदेशाचे पाबंदी. त्यांनी बंद केलं. याना आदेश देणारे या दूष्काळाचही राजकारण करून चाराछावण्या बंद करून आधीच्या सरकारचा नाकर्तेपणा दाखवायाच्या प्रयत्नात आहेत. जनावरांची या सरकारास अफाट माया आहे. मागेच आपन पाहिलंय गोहत्याबंदी. या काळात निदान गौमातेचा तरी सरकारने विचार करावयास हवा होता. हायकोर्टास गोमातेची दया आली त्यांनी विचारलंय 'चाराछावण्या बंद का ?'
तिथून आता हे वठणीवर येणार. या प्रसंगी सरकारातले सहभागी महाभाग शेतकर्यांचे नेते गुळगट्टम मंत्रीपदाचा आंबा पाडण्यात व्यग्न असून ते शेतकर्याची बाजू घेवून सरकारच्या राजकारणात विघ्न तुर्तास आणू इच्छित नाहीत हे दिसते.
ही बारी गेली जूमलाजुलमीत निदान पुढच्या बारी तर बांधावरल्यानी कुठं टाॅनिक द्यायच आणि कुठं तणनाशक मारायचं एवढं लक्षात ठेवलं तरी बरं होईल.

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

ईतिहास परिषद !!!!


शरद पवारांनी ईतिहास परिषद घेतली, त्याच्यानंतर सगळीकडे गदारोळ ऊठलाय.
आज या परिषदेची गरज काय ?
एक वाक्य आपन नेहमी अभिमानाने मिरवून ऐकत असतो. 'दूसर्या राज्यांना फक्त भूगोल आहे पण महाराष्ट्राला ईतिहास आहे.' हे खरेही आहे. ईतिहास आहे, संस्कृती आहे, जून्यापूराण्या वास्तू आहेत. हे निश्चितच अभिमानास्पद आहे. 
दूर्दैव इतकेच की त्या महापूरषांना जातीधर्मात विभागलं गेलं. हे कधी झालं ? याचा उगमस्त्रोत कुठ आहे हे पाहील पाहीजे.
आज सेक्युलर नाॅनसेक्युलर इ विभागवारी आपल्यात आहे. हे कशामुळं झालं ? इत्यादी प्रश्नांचा उहापोह होणे गरजेचे वाटत आहे.
आपल्या भोवताल ईतिहास हे फक्त ऐकून वाचून किंवा मालिका, सिनेमा ईत्यादीतून हे समाजापर्यंत पोहचतंय. आता लिहणारा, सांगणारा तो त्याला ज्या पद्धतीने आकलन झालेलं आहे अधिक त्याची मतं तो लादत नसेल कशावरून ?
तर हे थोड्याफार फरकाने झालेही असेल. शक्यता नाकारता येत नाही. यातून जर जातीधर्मात रोज तंटे लागत असतील, तर कितीही विकासाच्या गप्पा केल्या तरीही समाजाची स्थिती सुधारत नाही. सामाजिक एकोप्यातूनंच प्रत्येक कार्य पुर्णत्वास जाते. इथे तर बरीच कामे एकमेकावर अवलंबून आहेत. त्याप्रसंगी एकदा सत्य समोर येवून एकदाची पक्की मांडणी झाली की त्याला प्रमाण मानून जर शांतता प्रस्थापित होणार असेल तर कुणाचा विरोध का व्हावा ?
आता शरद पवार हे काही ईतिहास तज्ञ नाहीत. विरोधी पक्षनेते आहेत. नवे सरकार आल्यापासून जाणिवपुर्वक त्या सरकारातील लोकांनी जनतेसमोर आपन काय ठेवतोय याचंही एकदा विचार झाला पाहीजे.
गोहत्याबंदी, पाचपंचवीस मुलं जन्माला घालायचा सल्ला, पंकजाताई अभ्यासक्रमात काय समाविष्ट करू पाहत आहेत ?, अखलाक ते रोहित वेमुला, पठाणकोट हल्ला, अभाविपची कारनामे ई. गोष्टी कोणत्या वेगाने येवून आदळत आहेत ? याचे परिणाम काय होणार आहेत ?
याची उत्तरं भयानक आहेत. दोन जातीधर्मात जर वाद लागले तर त्याचा शेवट काय होतो ? कित्येक सामान्यजनांचाच यात बळी जातो. आणि रोष कायमचाच राहतो. तो निराळा.
याप्रसंगी विकासाच्या चकचकीत गप्पा मारत असताना देशात जर रक्ताचे सडे पडत असतील तर तो विकास घेवून काय मेलेल्यांचे पुतळे बनवायचे आहे काय ?
जग आज जवळ आलंय. भारताची अर्थव्यवस्था मोठ्ठी आहे, ते असूनही कधी कशाला धक्का नाही. लोकसंख्येच्या मानाने तितक्याच जातीधर्मजमाती इथं आहेत. रोज ऊठून जर देशांतर्गतच भांडण होणार असतील तर पाकिस्तानातून येणारे दहशतवादी काय घरजावई आहेत ? सर्वात पहिल्यांदा देशी दहशतवादाचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. त्याचा संबंध ईतिहासाशी कुठेतरी अस्मिता भावने यातून जूळलाय. एकदा ही बैठक पक्की झाली की बरेच वाद मिटतील.
पवार ईतिहास लिहत नाहीत. ईतिहासात जे तज्ञ लोक आहेत त्यांना घेवून ते परिषद घेत आहेत. मतमतांतरे असू शकतात. ती खोडूनही काढावीत. त्यात जर एखादं संशोधन पुढं येत असेल तर त्याचा समावेश व्हावा. चांगलं घ्याव वाईट टाकावं. ऊगाचच काहीही न करता किंवा माहित असता का वाद घालायचा ?
असं होणं गरजेचं आहे.

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

भ्रष्टाचार !!!!

भ्रष्टाचार !!!!
अर्थविशेष म्हणून एक दिवाळी अंक यायचा. एकवर्षी म्हणजे अलिकडे तीन वर्षापूर्वी त्यांनी 'भ्रष्टाचार' म्हणून एक विषय घेवून त्या त्या पंतप्रधानपदाच्या काळातील झालेले भ्रष्टाचारासंबंधीचे मोठ्ठे पूस्तक केलते. ते खरंही असेल, नाही असं नाही. 
अगदी सर्व माणसांना 'दूसर्यानी केलेल्या भ्रष्टाचारावर' राग असतोच. सलग चारपाच वर्षाअलिकडचे वृतपत्र बघितले तर त्यातही सर्व स्तराच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या सापडतील. म्हणजे गावातला तलाठी, वीज कर्मचारी, अधिकारी ते थेट तहसिलदार, जिल्हाधिकारी वगैरे. एकेक लोक तर इतके मोठ्ठे झाले ते काय विचारायला नको इतके. दहा पंधरा लाख बोडक्यावर कर्ज असताना, आज ते लोक चारचाकी, बंगला, नदीचं पाईपलाईन, घरात उत्तमसुखसोईनियूक्त जीवन जगत आहेत. हे खेड्यातले छोटे पुढारी. त्यांना मान आहे, हारतूरे, एखादा समाजसेवेचा किंवा कृषिभूषण असला एखादा पूरस्कार, शालश्रीफळ, अडाणचोटाला संस्कृतमधलं, इंग्रजीतलं न वाचता येणारं मानपत्र वगैरे मिळते आहे. वाढदिवसाला स्टँडवर फ्लेक्स इ.
हे मिळवण्यात फारसं काही कर्तृत्व आहे अशातला भाग नाही. काहीजण यात शुन्यातंन वर येतात तर काहीजण बापाच्या जीवावरलं एखादं विकून मोठ्ठा होतो. यात फारसा शहाणपणा नाही. फक्त धाडस, गुंडगिरी आणि मुर्खपणा. यांच्याविरूद्ध आवाज उठवणार्याला हे विविध प्रकाराने दबावात आणून संपवतात. हे सत्य आहे. पैशासाठी लाचार झालेले अधिकारी आणि पोलिस त्याला काही भिरकावडलेल्या तूकड्यांसाठी मदत करतात. हे सगळे हरामी लोक मिळून त्या आवाज उठवणार्याला संपवायला मदत करतात. कधीकधी कायदा हा पोलिसापासून सामान्य माणसाला वाचवायला आहे असे वाटते. असे लोक गल्लोगल्ली तयार झालेत. बदल्यात आवाज ऊठवणाराही प्रामाणिक असला तर...? ईलेक्शन लढवणे हे आजघडीला पैशावाचून शक्य नाही असे चित्र. अशी भिषन परिस्थिती आज ओढावली आहे. हे काही एका खेड्याच चित्र नसून हेच अखंड भारतात चालत आहे. आमदार खासदार आणि एकेकाळचे मंत्री लोकही यात शामिल आहेत.
सामान्य माणूस काय करेल मग ?
एखाद्या सिंघम किंवा दबंग सिनेमाची तिकीट ब्लॅक नं घेवून टाळ्या पिटून बाहेर पडेल. यावर काही नाही. पण हाच रोष रस्त्यावरही आलेला एकदा पण त्याचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात गेलं, आणि त्यांचे उपचारही भयानक होते. याच रोषाला एक दिशा व्यवस्थित मिळाली तर पैसे घेताना आणि निर्लल्जपणे वागताना चळाचळा हिच लोक कापली असती. भ्रष्टाचाराच्या आरोपातले खरे आरोप सिद्ध होणे ही पायरी महत्वाची. तसा सापडला तर कोणताही मुलाहिजा न राखता कठोर शासन अशा लोकांस झालं पाहिजे. तिथे कुठली अस्मिता आड येता कामा नये.

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

रोहित वेमुल या युवकाने आत्महत्या केली. त्याच्यानंतर देशातलं वातावरण ढवळून निघालं. 
माणूस जगत असताना त्याच्या अशा कृत्याला आजूबाजूची परिस्थिती जबाबदार असते. रोहितंच पत्र वाचलं की ते लक्षात येईल असं नाही. तो त्यात लिहतो की कुणालाही जबाबदार धरू नये. ही गोष्ट दुर्लक्षून चालणार आहे का ? 
त्यापुर्वी आधीच्या घटनांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. आधी वाद झाले. अभाविप च्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. थेट केंद्रीय मंत्रालयातून विद्यापिठावर दबाव आले. आणि विद्यापीठातून रोहीत आणि इतर चौघांचं निलंबन करण्यात आलं.
हा निर्णय संविधानिक मार्गाने घेतलं असल्याचं केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाचं म्हणनं आहे.
आता स्पष्ट हे आहे की यात केंद्रीय मंत्रलयाचा सहभाग आहे. अभाविप च्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीची इतकी उत्साही दखल घेण्याचं काम हे मंत्रालय कसं करू शकतंय ? हा मुळ प्रश्न आहे. याचे उत्तरही फारसे अवघड नाही. अभाविप ही सत्तेत असलेल्यांचीच एक टोळी. सत्तेत असणारे सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मनसुबे हे गेल्या काही दिवसात स्पष्ट होताना दिसत आहे.
रात्रभर न्यायालय चालवून याकुब मेमनला फासावर चढविणे. (याकुबबद्दल आम्हाला आत्मियता आहे किंवा याकुबप्रेमी आहोत असा अर्थ घेवू नये.)
अखलाक या मुस्लीम व्यक्तीच्या हत्येत कोणाचा हात होता ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज शोधताना विकासाच्या फ्री गप्पांची किव येते.
मोदी यांना अखंड जगाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे की काय ? असा प्रश्न पडतो. इतके हे विदेश दौर्यात मश्गुल आहेत. तिथे जावूनही यांची छप्पनइंची वकत्व्ये थांबली नाहीत. ह्यांना आधी भारतीय असल्याची लाज वाटत होती हे जाहिर वक्तव्य आपल्या पंतप्रधानांचं आहे. आज हे पंतप्रधान होवून पावणेदोन वर्ष झाली. काय अभिमानाने टेंभा मिरवण्याजोगे यांचे कार्य आहे ?
लोकशाहीचा होताहोईल इतका गळा घोटण्याचे कार्य अत्यंत पद्धतशीरपणे चालू आहे. ह्याची सुरवात खूप आधीपासूनची आहे. मै हिंदू राष्ट्रवादी हुँ ! ते गांधी जयंतीला अहिंसा लपवून ठेवून पद्धतशीरपणे खराटा जनतेच्या हाती देत लोकशाहीची लोटझाड यांनी सुरू केलीये. तिथे सनातन सारख्या संस्थावर बंदी घाला ही अपेक्षा या लोकांकडून करणे हे चुकीचे ठरते.
आजउद्या जर हे धार्मिक जातीय प्रदूषन ज्ञान गंगेत डुबकी मारून पवित्र व्हायचे ठरवत असेल तर उद्या ह्याच तरूणाईच्या हातात बंदूकी येतील.
आता खरीच कुणाला लाज वाटते याचा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर हिशोब होणे गरजेचे आहे. 20 january