शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

भ्रष्टाचार !!!!

भ्रष्टाचार !!!!
अर्थविशेष म्हणून एक दिवाळी अंक यायचा. एकवर्षी म्हणजे अलिकडे तीन वर्षापूर्वी त्यांनी 'भ्रष्टाचार' म्हणून एक विषय घेवून त्या त्या पंतप्रधानपदाच्या काळातील झालेले भ्रष्टाचारासंबंधीचे मोठ्ठे पूस्तक केलते. ते खरंही असेल, नाही असं नाही. 
अगदी सर्व माणसांना 'दूसर्यानी केलेल्या भ्रष्टाचारावर' राग असतोच. सलग चारपाच वर्षाअलिकडचे वृतपत्र बघितले तर त्यातही सर्व स्तराच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या सापडतील. म्हणजे गावातला तलाठी, वीज कर्मचारी, अधिकारी ते थेट तहसिलदार, जिल्हाधिकारी वगैरे. एकेक लोक तर इतके मोठ्ठे झाले ते काय विचारायला नको इतके. दहा पंधरा लाख बोडक्यावर कर्ज असताना, आज ते लोक चारचाकी, बंगला, नदीचं पाईपलाईन, घरात उत्तमसुखसोईनियूक्त जीवन जगत आहेत. हे खेड्यातले छोटे पुढारी. त्यांना मान आहे, हारतूरे, एखादा समाजसेवेचा किंवा कृषिभूषण असला एखादा पूरस्कार, शालश्रीफळ, अडाणचोटाला संस्कृतमधलं, इंग्रजीतलं न वाचता येणारं मानपत्र वगैरे मिळते आहे. वाढदिवसाला स्टँडवर फ्लेक्स इ.
हे मिळवण्यात फारसं काही कर्तृत्व आहे अशातला भाग नाही. काहीजण यात शुन्यातंन वर येतात तर काहीजण बापाच्या जीवावरलं एखादं विकून मोठ्ठा होतो. यात फारसा शहाणपणा नाही. फक्त धाडस, गुंडगिरी आणि मुर्खपणा. यांच्याविरूद्ध आवाज उठवणार्याला हे विविध प्रकाराने दबावात आणून संपवतात. हे सत्य आहे. पैशासाठी लाचार झालेले अधिकारी आणि पोलिस त्याला काही भिरकावडलेल्या तूकड्यांसाठी मदत करतात. हे सगळे हरामी लोक मिळून त्या आवाज उठवणार्याला संपवायला मदत करतात. कधीकधी कायदा हा पोलिसापासून सामान्य माणसाला वाचवायला आहे असे वाटते. असे लोक गल्लोगल्ली तयार झालेत. बदल्यात आवाज ऊठवणाराही प्रामाणिक असला तर...? ईलेक्शन लढवणे हे आजघडीला पैशावाचून शक्य नाही असे चित्र. अशी भिषन परिस्थिती आज ओढावली आहे. हे काही एका खेड्याच चित्र नसून हेच अखंड भारतात चालत आहे. आमदार खासदार आणि एकेकाळचे मंत्री लोकही यात शामिल आहेत.
सामान्य माणूस काय करेल मग ?
एखाद्या सिंघम किंवा दबंग सिनेमाची तिकीट ब्लॅक नं घेवून टाळ्या पिटून बाहेर पडेल. यावर काही नाही. पण हाच रोष रस्त्यावरही आलेला एकदा पण त्याचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात गेलं, आणि त्यांचे उपचारही भयानक होते. याच रोषाला एक दिशा व्यवस्थित मिळाली तर पैसे घेताना आणि निर्लल्जपणे वागताना चळाचळा हिच लोक कापली असती. भ्रष्टाचाराच्या आरोपातले खरे आरोप सिद्ध होणे ही पायरी महत्वाची. तसा सापडला तर कोणताही मुलाहिजा न राखता कठोर शासन अशा लोकांस झालं पाहिजे. तिथे कुठली अस्मिता आड येता कामा नये.

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

रोहित वेमुल या युवकाने आत्महत्या केली. त्याच्यानंतर देशातलं वातावरण ढवळून निघालं. 
माणूस जगत असताना त्याच्या अशा कृत्याला आजूबाजूची परिस्थिती जबाबदार असते. रोहितंच पत्र वाचलं की ते लक्षात येईल असं नाही. तो त्यात लिहतो की कुणालाही जबाबदार धरू नये. ही गोष्ट दुर्लक्षून चालणार आहे का ? 
त्यापुर्वी आधीच्या घटनांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. आधी वाद झाले. अभाविप च्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. थेट केंद्रीय मंत्रालयातून विद्यापिठावर दबाव आले. आणि विद्यापीठातून रोहीत आणि इतर चौघांचं निलंबन करण्यात आलं.
हा निर्णय संविधानिक मार्गाने घेतलं असल्याचं केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाचं म्हणनं आहे.
आता स्पष्ट हे आहे की यात केंद्रीय मंत्रलयाचा सहभाग आहे. अभाविप च्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीची इतकी उत्साही दखल घेण्याचं काम हे मंत्रालय कसं करू शकतंय ? हा मुळ प्रश्न आहे. याचे उत्तरही फारसे अवघड नाही. अभाविप ही सत्तेत असलेल्यांचीच एक टोळी. सत्तेत असणारे सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मनसुबे हे गेल्या काही दिवसात स्पष्ट होताना दिसत आहे.
रात्रभर न्यायालय चालवून याकुब मेमनला फासावर चढविणे. (याकुबबद्दल आम्हाला आत्मियता आहे किंवा याकुबप्रेमी आहोत असा अर्थ घेवू नये.)
अखलाक या मुस्लीम व्यक्तीच्या हत्येत कोणाचा हात होता ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज शोधताना विकासाच्या फ्री गप्पांची किव येते.
मोदी यांना अखंड जगाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे की काय ? असा प्रश्न पडतो. इतके हे विदेश दौर्यात मश्गुल आहेत. तिथे जावूनही यांची छप्पनइंची वकत्व्ये थांबली नाहीत. ह्यांना आधी भारतीय असल्याची लाज वाटत होती हे जाहिर वक्तव्य आपल्या पंतप्रधानांचं आहे. आज हे पंतप्रधान होवून पावणेदोन वर्ष झाली. काय अभिमानाने टेंभा मिरवण्याजोगे यांचे कार्य आहे ?
लोकशाहीचा होताहोईल इतका गळा घोटण्याचे कार्य अत्यंत पद्धतशीरपणे चालू आहे. ह्याची सुरवात खूप आधीपासूनची आहे. मै हिंदू राष्ट्रवादी हुँ ! ते गांधी जयंतीला अहिंसा लपवून ठेवून पद्धतशीरपणे खराटा जनतेच्या हाती देत लोकशाहीची लोटझाड यांनी सुरू केलीये. तिथे सनातन सारख्या संस्थावर बंदी घाला ही अपेक्षा या लोकांकडून करणे हे चुकीचे ठरते.
आजउद्या जर हे धार्मिक जातीय प्रदूषन ज्ञान गंगेत डुबकी मारून पवित्र व्हायचे ठरवत असेल तर उद्या ह्याच तरूणाईच्या हातात बंदूकी येतील.
आता खरीच कुणाला लाज वाटते याचा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर हिशोब होणे गरजेचे आहे. 20 january

सोमवार, १८ जानेवारी, २०१६

इथ ज्या ज्या वेळेला काही घडत असतं, त्यावेळी सगळंच शंकास्पद वाटतंय. गरीब असतो तो तळमळून मरतो पण त्याला न्यायच मिळत नाही. कितीतरी खून होतात, बलात्कार होतात, हत्याकांड होतात, दंगली होतात नंतर नंतर ते सगळं पुसट होतं जातं. आपनही (जनता) सगळ विसरून जातो आणि ब्रेकिंग न्युज वर जोक, आलेले इमोशनल मेसेज फाॅरवर्ड करून दाखवण्यासाठी दुःखी अथवा सुखी होतो. पण त्यातलं शेवटपर्यंत कधीच काहीच राहत नाही आणि त्यावर कुणाला विचार करावा वाटत नाही हे एक दूर्दैव. 
ज्या ठिकाणी समान संधीच्या गोष्टी होतात किंवा असतात, तिथंच त्या समानाचा गळा घोटला जातो. आणि चिमुटभर बलाढ्य लोकांच्याच हातंची बाहुली ही व्यवस्था होते. त्यावेळी समान संधी/हक्क मिळायची व्यवस्था मरते. मग सर्वत्र न्युट्र्यालिटी येते. मोठ्ठा अधिक मोठ्ठाच होतो लहान अथवा गरीब हा अधिकच गरीब होवून कधीतर नष्ट होतो.
चिवट झुंज देतो तो मध्यमवर्गीय होतो. आत्ताच्या या व्यवस्थेतल्या चाणक्यांना मध्यमवर्गीय हे अतिप्रिय. हेच मध्यमवर्गीय मिटक्या मारत जोक फाॅरवर्ड करत बसतात. अर्थात ती त्यांची चुक नाहीच. त्यांचा तो विरंगुळा आहे. कधीकधी लहान मोठे उद्रेक होतात त्यावेळी रस्त्यावर कोण असतात ?
त्यांना रस्त्यावर नेणेही आणि समर्थनार्थ अथवा विरोधात घोषना द्यायला लावणारे असतात हे यांना कळत नाही. ह्यांना आपलेच अप्रिम कौतुक. हे बनावट असतं हे सांगणार तरी कोण ?
वापरून झाल्यावर बांधून ठेवणे. पाहिजे त्यावेळी गर्दीला रस्त्यावर नेणे आणि पाहिजे त्यावेळेस तिला कोंडून ठेवणे हे आत्ता होतंय. हे वाईट आहे. समर्थनार्थ गर्दी उतरवून व्यवस्थेत उतरल्यानंतर त्या गर्दीची ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी ती आक्रमक न होता केलेल्या समर्थनाची लाज वाटून ती शरमिंदी होते. त्यावेळी एकाधिकारशाही अथवा हुकूमशाहीची सूरवात असते. हे जाणवायला वेळ लागतो आणै आपन वर्षानुवर्षे अधिकच अआंधळे होतो.
सन्मानाने पोट भरत नसते.
समान संधी दिसायला असतात किंवा मानायला असतात. कर्तृत्वान असतो तो पुढे येतो हे जगजाहिर असतं. तो पुढे येतो त्याचा स्तर ऊंचावतो हे मान्य. पण तो कुणाच्या छत्रछायेखाली पहुडतो ? कुणाचा गुलाम होतो हे त्यालाही ठावूक नसतं.
अशा परिस्थितीत मोटिव्हेशनल आणि इंटरप्रेनिंगचं प्लॅस्टीक युग चालू होतं. मग सलमान सूटला की जल्लोषाचे निर्लज्ज तमाशे सूरू होतात.

10 december 2015
काही वर्षांपुर्वी एक नेता, राजा या जगी होवून गेला. तो एकाच वेळी राजा आणि बुद्धीवंत होता, लोकांना खेचायचा नेहमी आपल्याकडे. तर तो बराच आत्मविशास असलेला होता त्याच भरात तो बोलून गेला 'अशक्य' हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही. 
असा तो आत्मविश्वास. 
त्याने सांगितलेलं आणि आजही तंतोतंत लागू पडत असलेलं एक विधान ' A man will fight harder for his interests than for his rights.' (माणूस आपल्या हक्कापेक्षा फायद्यासाठी जास्त लढतो).
............................................................
आजच्या या वातावरणात मला याची हटकून आठवन होतेच होते. गर्दी खेचणार्या जंगी सभा होतात, एखादे विरोधक सत्ताधारी होतात आणि सांगितलेल्या विकासाच्या मुद्दयावरून ते थेट धर्माच्या वातावरणात घसरतात, आणि परिस्थिती हाताबाहेर जावून भयंकर घटना घडू लागतात. आणि 'असहिष्णु' परिस्थिती होते. त्यावेळेस सरकार त्याला जबाबदार असते. ही साधी सरळ बाब.
............................................................
लोकसभा निवडणुकीत जो पक्ष निवडूण आला, आणला ते कुणी आणलं ?
स्वतः एकाच्या जिवावर नरेंद्र मोदींनी.
आज 'असहिष्णू' वातावरणात पूरस्कार वापस करणारे कितीजण ?
तर ते पन्नासेक थोडे अधिक किंवा कमी. बुद्धिमंत हे चांगलेच त्यांनी पुरस्कार परत केलं हेही ठिक. पण जर आजरोजी जनमताचा कौल घेतला तर बुद्धीमंत लोकांच्या पाठी उभे राहण्यापेक्षा मोदींच्या पाठीशी जास्त लोक निर्विवादपणे राहतील यात मला या क्षणी कोणतीच शंका नाही. कारण ही तसंच, पुरस्कार परत करणारे एकतर लेखक किंवा कलाकार त्यात या करोडोंच्या संख्येने लोक राहणार्या देशात यांच्या कलाकृती अथवा साहित्यकृती विचार कितपत लोकांपर्यंत पोहचल्या हे बघणे गरजेचे आहे असे वाटते.
अनेक लोकांना पुरस्कार परत केल्यानंतर एखाद्या लेखकाचे अथवा कलाकारचे नाव माहित झाले. हे सत्य आहे याकडे कानाडोळा करून चालायचे नाही.
................................................................
हे असे का ?
शहाणा माणूस एखाद्या मुर्खाला भेटायला जितका नाराज असतो त्याच्याच शंभरपटीने मुर्ख माणूस शहाण्याला भेटायला नाराज असतो.
त्यात आमचे जे बुद्धिमंत लोक आहेत हे स्वतःच्या कोशातंच रमणारे. ते त्यांचा समूह, दर्जेदारपणाच्या चर्चा इत्यादीतून बाहेर पडत नाहीत ते आपल्याच कोशात रममाण, तल्लीन, गर्क असतात.
त्यात त्यांचा असाही विचार असु शकेल की ' मुर्खांशी किती हुज्जत घालायची ?' .
जे असेल ते असो. पण हे लोक सामान्यांपर्यंत पोहचावयास कमी पडले हे तर ध्यानी घ्यावं.
.............................................................
सामान्य लोक कुठे गेले ? कसे फसले ? त्यांना मुर्ख कुणी बनविलं ?
काळाचा झपाटा असा काही वेगवान असतो की तो भलभल्यांनाही चिरडून टाकतो. मग वेळ गेल्यावर हाती काहीच शिल्लक राहत नाही.
तर सामान्य लोकांची गर्दी ही एखाद्या नवसाला पावणार्या देव देवीच्या मंदीरात दिसेल,
सामान्यांची गर्दी एखाद्या धर्मवादी नेत्याच्या सभेत दिसेल.
सामान्यांची गर्दी ही एखाद्या आसाराम सारख्या संताच्या सत्संगात दिसेल.
सामान्य माणूस कधीच न येणार्या एखाद्या कायद्यासाठीच्या आंदोलनात दिसेल.
यावरून तर सामान्य लोक आपला पत्ता चुकलेत हे ध्यानी आलं असेलंच.
...............................................................
सामान्य लोक तिथे का गेले ?
परत मी नेपोलियनला आणतोय.
'लोक आपल्या हक्कापेक्षा आपल्या फायद्यासाठी जास्त लढतात.'
वर्षाणुवर्षे चालत आलेल्या धर्मपरंपरांचा दांभिक अभिमान असतो, जर कुणी आपल्या धर्मातल्या चुका दर्शवायचे काम करत असेल तर त्यास आपला विरोध असतो, त्याच्याप्रति राग असतो, त्याला अस्मिता हे कारण, ते प्रत्येकाच्या मनामनात दडलेलं असतं. जो एखादा समूहा पुढे असा व्यक्त होतो त्याला ही गर्दी डोक्यावर घेते.
आजचे संत ज्यांचं काही जपल्यानं, भजल्यानं लाभ होत असतो, नजर लागत नसते, सूरक्षा कवच येते त्या सत्संगास लोक गर्दी करतात आणि वरतून खिसाही रिकामा करतात, श्रद्धा हा भाग सोडल्यास ढोंगीपणास आमचा विरोध आहे.
तर हे अशापद्धतीचे 'फायदे' लोकांसमोर आहेत तिथे सामान्यजन गर्दी करतो.
.....................................................
आता हक्क...
अंनिस ही संस्था तात्विक तिथे गर्दी नाही.
आम्हास आजही काही ठिकाणी प्यावयास शुद्ध पाणी नाही तिवरच्या आंदोलनात गर्दी नाही.
अलिकडे महिलांची एक संस्था 'राईट टु पी' म्हणून एक आंदोलन चालवते त्यात त्या महिलांसाठी शौचालयाची मागणी करताहेत. तिथे गर्दी नाही.
ही आजच्या तारखेची कथा.
..............................................................
लोकमान्य टिळक लिहायचे त्यांचे अग्रलेख लोक वाचायचे आणि चळवळीची दिशा ठरायची. आज तसे होते का ? मुदलात अग्रलेख कोण वाचतो ? हा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांचे वाचायचे यामागची कारणं लक्षात घेतली तर ते लगेच लक्षात येईल ते लोकांपर्यंत पोहचले होते. बरीच जूने लोक आहेत. (येथे त्यांचे विचार वगैरे प्रश्न थोडे दुर्लक्षा)
...............................................................
शेवट :
आजचे काय ?
जोपर्यंत आपला कोश, विश्व सोडून हे बुद्धीमंत लोक सामान्यांपर्यंत पोहचत नाहीत तोपर्यंत परिस्थितीत सुधारणा होणे महाकठीण. दोन पर्यांयावर देश चालत आहे. तिथे आणखी पर्याय उभारणे हे कठीण असले तरी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळेच झालीतर कुठे सुधारणा होईल.
नाहीतर इंग्लीश दारू आवडते पण मुलामुलीनं परजातीत केलेलं लग्न आवडणार नाही असाच आपला 'विकास' होईल. आणि यास बुद्धिमंतच जबाबदार असतील.
आज पवारसाहेब आलते शिरोळला सारे आजोबांच्या पुर्णाकृती पूतळ्याच्या अनावरनाला. 
पवारसाहेब जिल्ह्यात, सांगलीत कुठंबी येणार असले की मला वैयक्तीक आनंद होतो. गाडी घेतो आणि सुटाळतो. 
आज साडेतीनंच टायमिंग होतं. पवारसाहेब टायमात हजर होवून पुतळा अनावरन करून स्टेजवर गेले. सहकारमंत्री चंद्रकांतदादा, पतंगराव कदम, सारे आजोबांचे जवळचे मित्र थोरात आणि डझनभर नेतेमंडळी होती. 
प्रास्ताविक आवाडेदादांनी केलं. जे रटाळ असतं. त्याच्यानंतर थोरातांनी भाषन केलं. त्यांचा आवाज आणि तोंडावरचे एक्सप्रेशन बघण्याजोगे असतात.
मग पतंगराव कदमांचं भाषनसाठी नाव पुकारलं, पतंगराव लै मज्जा करतात. ऊठतानाच इजार वढत वढत ऊठले, परत माईक समोर येवून ऊभं राहिल्यावर एकदा वढले. मग एकेकाची पद्दशीर इज्जत काढत काढत उल्लेख केले. आमच्या आमदार उल्हास पाटलांची तर एवढी चेष्टा केली काय विचारू नका. नंतर म्हणटले.
दत्त कारखान्याचे संस्थापक दत्ताजीराव कदमांचा पूतळा सारे पाटलानी बसवला.
दिनकरराव यादवांचा पूतळा बसवला.
आत्ता आपन सगळ्यानी मिळून सारे पाटलांच पूतळा बसवलं.
कर्तृत्वान माणसाची पूतळं बसवतात.
मधेच त्यांना चंद्रकांत दादा दिसले. हे एकदा जे पट्टा चालु केला कदमांनी ते शेवटपर्यंत चंद्रकांतदादाना धूतंल.
म्हणटले. तुम्ही संघात असता. हाफ विजार काठ्या घिवून जाता. तिथं शिस्त शिकवत्यात. कडक शिस्त. तुमी बी लै कडक शिस्तवान रावं. मोदीस्नी सांगून तेवढं साखर कारखानदारीचं बघा की.
असं लै मजेदार भाषन केलं.
मग चंद्रकांत दादांच भाषन चालु झालं. चंद्रकांतदादा हा माणूस अगदी चतुर आहे. आपल्यावर आलेलं पद्धतशीरपणे पवारसाहेबांवर ढकलंल. म्हणटले मोदी माझ्यापेक्षा पवारसाहेबांच जादा ऐकतात. त्यांनाच सांगायला लावलं पाहीजे. चंद्रकांतदादांचे उच्चारसुद्धा स्प्षट असतात. तितकंच भाषनही मुद्देसुद.
त्यानंतर साहेबांचं भाषन.
साहेब म्हणटले,
पतंगराव कदम माणूस चांगलं आहेत. ते बोलायला लागलं की मला बी भ्या वाटत्या. आज भारती विद्यापीठाचं सर्वत्र नावं आहे. पतंगरावकडून नियोजन शिकलं पाहीजे.
नंतर चंद्रकांतदादांची तारिफ केली. आणि जी ठिणगी पडलीती ती विझवली. आज जगाच्या बाजारपेठेत साखरेची कंडीशन काय आहे. यावर त्यांनी थोडा वेळ बोलले. जपान मध्ये एका संशोधकांच्या टीमने एक नवीन ऊसाची प्रजात तयार केलीय. त्यात ऊसाला चाळीस दिवसातून एकदा पाणी दिलं की ते चालतंय. म्हणजे पाण्याची गरज अगदीच कमी. सरासरी 65टन उतारा प्रतिएकरी पडतो. आत्ता आपल्याकडे 34 उतारा आहे. आणि त्याचा साखर उताराही 12 आहे. त्या संशोधकांबरोबर काल साहेबांची चर्चा झाल्या. ते हिकडं आणायचं नियोजन चालु असल्याचं साहेबांनी सांगितलं.
साहेबांकडून घेण्याजोगं लै कायकाय आहे, इथंच बघा की दोन मिनटात पतंगरावांची भांडणं मिटवली. नवीन तंत्रज्ञानाविषयी सजगता दाखवली. एक खरं सांगतो, पवारसायबांच इमप्रेशन नादखुळाच पडतंय.
..
सा.रे पाटील आमच्या पलिकडच्या जांभळी गावातले. ते समाजवादी होते. विवीध क्षेत्रातली लोकं ओळखीची. नरेंद्र दाभोलकरांच्या चळवळीत होते. आणि बरंच काहीकाही.
ह्या लोकांकडंन बघून शिकलं पाहीजे असं वाटतंय. आज जे नुस्तेच साहेबांचे अनुयायी म्हणून मिरवणारे पांढर्या शर्टवाल्यांनी थोडफार इकडंतिकडंही पाहीलं तरी बरं होईल.

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

यो यो, नमो आणि किम.....

यो यो, नमो आणि किम.....
...................................................
प्रत्येक जण इथ जगत असतो. म्हणजे त्याचा श्वाच्छोस्वास चालु असतो. प्रामाणिक असणे, नेक/नेकी असणे, कामात झोकून देणे, निष्ठेला जागणे, रमतगमत जगणे, सरळ जगणे अशा काही प्रचंड व्याख्या जगण्याच्या असतात. ज्याची त्याची निराळी. म्हणून इथे जगणे म्हणजे श्वाच्छोसवास चालू असणे असे धरू.
असे जगत असताना आपन लहानसहान प्रयत्न करत असतो. यश अपयश हे आपल्या प्रयत्नावर मिळत असतं.
आत्ताच अलिकडच्या काळात यो यो हनीसिंग हा तरूणाईच्या गळ्यातला ताईत झालाय ईतका की त्याचं नाव यो यो हनिसिंग असं घेतलं तरी बहूसंख्य तरूणाई चेकाळते. त्याच्या गुणांना नावं ठेवायचा कोणताही उद्देश इथे नाही. तरीही तो जी गाणी गातो त्यावर विचार करताना काय जाणवतं ? बर्यापैकी मुलांना प्रेम मिळत नसतं हे इथं जगजाहिर सत्य आहे. किंवा प्रेमात दगा मिळतो. फक्त हनिसिंग तो दगा किंवा ते प्रेम कसं सेलिब्रेट करायचं ते सांगत असतो. ब्रेक अप पार्टी हे बरंच गाजलेलं गाणं काय म्हणतंय ?
तिला कसा धडा शिकवणार ! मग तिची हालवस्था वगैरे काय होईल ? असं ते सुंदर (*) वर्णन केलेलं गाणं आहे. त्यामुळे ते आवडतंय असं म्हणटलं तर त्यात काय चुक ?
अलिकडेच म्हणजे दीड वर्षं झालेले आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी. नमो नमो किंवा मोदी मोदी (कृपया लालूंची एक्टींग आठवू नये.) असे नारे घुमत होते लाखो मुखातून ! निवडणुकपुर्व काळात आण्णा हजारेंच ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी आण्णा आण्णा किंवा मै हुँ आण्णा असे टोप्या घालणारे काय कमी होते का ?
तीच गर्दी कुठे वळली याचा नीट शोध घेतला तर अरविंद केजरीवालांच्या माकडचाळ्या खेळानंतर ती सरळ मोदींच्या मैदानात आली. आता जर त्यावेळचा काळ आठवला तर काय दिसतं ? इतकं काळं धन आहे ना त्यात प्रत्येकाला पंधरा लाख मिळणार आहे अशा बाता आपले पंतप्रधान मारायचे. आपली जनता सुद्धा अशी आहे की तिला भावनिक व्हायला एक मोदी, एक आण्णा नाहीतर एक यो यो लागतो.
त्याच मोदीवाटेने जनतेची वाटचाल पंतप्रधान पदाला मोदींना बसवून स्थिरावली. आत्ता त्या मेणबत्त्या आणि पणत्या कुठे गायब झाल्या ह्याचा थांगपत्ता लावणे तसे कठीण काम नाही.
काँग्रेस राजवटीत बोकाळलेल्या भष्टाचार आणि त्याच्या बातम्या या रोज कामावरून येवून टीव्ही बघून झोपणार्याला हैराण करायच्या. त्याप्रति त्या माणसाला चीड राग संताप आला नसेल तर नवलंच !
कालंच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ अखंड दूनिया हादरवून सोडणारा हायड्रोजन बाॅम्ब फोडला गेला आणि शेजारपाजारी देशात पळापळ चालु झाली. बर्याच देशांनी त्याचा निषेध केला. चीन हा त्यांचा दोस्तराष्ट्र त्यानंही निषेध (?) केला.
मुळात किम हे व्यक्तिमत्वंच अजब आहे. त्यांनी बर्याचदा भलभल्यांना घाम फोडलाय तसं बघितलं तर ही घटना रिश्टर स्केल वर घाम फोडली.
माणूस अपयशी ठरला की त्याला खापर फोडण्यासाठी कायतर हवं असतंच असतं. दगा दिलेल्या पोरीवर तिची काय अवस्था काय करू हे सांगणारा एक योयो.
पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर देणारा नमो.
आणि
आता कोण कुणाला कंटाळेल आणि त्याला किम आवडायला लागेल हे कळेल थोड्याच दिवसात.
...........................
...........................

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

थोडं कोल्हापूर विधानपरिषदेबद्दल.....

थोडं कोल्हापूर विधानपरिषदेबद्दल.....
अकरावर्षामागे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे कै. दिग्विजय खानविलकर आरोग्यमंत्री होते. जिल्ह्याची बरीच सुत्रं ही महाडिकांकडे असत गोकुळ असो कि केडीडीसी बँक किंवा विधानसभा लोकसभा. खानविलकर लोकप्रिय होते, आरोग्यमंत्री असताना शासकीय हाॅस्पीटलांचा दर्जा सुधारण्याचं काम त्यांनी केलंत. अगदी सीपीआर देखील त्याकाळात त्यांनी बरंच आधूनिक केलतं. एकंदरीत त्यांचा प्रभाव वाढत होता त्यावेळी महाडिक आणि इतर काहीजणांनी त्यांच्याविरोधात बंटी पाटलाना बंडखोरी अर्थात अपक्ष मॅनेज करून बरंच पाठबळ देवून निवडूण दिलतं. त्याप्रसंगी पवारसाहेबांनी सांगितलं होतं असं करू नका पण केलंच. बंटी पाटील सुद्धा धडाडीचे. निवडूण आले बरीच कामं केली. दूसर्या टर्म ला परत निवडून आले. ते थेट गृहराज्यमंत्री झाले. पद्मश्री डी.वाय पाटलांचे ते चिरंजीव. दरम्यानच्या काळात महाडिकांचा त्यांनी पराभव केलता जे आज खासदार आहेत त्यांचा. बंटी विरूद्ध मुन्ना महाडिक हे समिकरण रूळलं. कार्यकर्ते दोघांचेही कट्टर.
सलग सत्तेचा सूकाळ आला कि माणूस बिघडतो. बंटी पाटील मंत्री झाले आणि स्थान मजबूत करत असतानाचं स्थानिक राजकारणात अगदी गावलेवलला सुद्धा अतिलक्ष घातलं त्यामुळं बरेच कार्यकर्ते दूरावले होते. कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर नेहमीच महाडिकांच्या मर्जीतला असायचा पण तिथंही बंटी पाटीलंच चमकले सलग दोनदा तिथला महाडीक प्रभाव झाकण्यात ते यशस्वी झाले. यात महाडिकांचा इगो हर्ट झाला. पण पुढे लोकसभा होती कागलचे सध्याचे आमदार आणि तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकरवी सतेज पाटलांचा पाठिंबा मिळवण्यात महाडिक यशस्वी झाले. महाडिकानी डाव साधला धनंजय खासदार झाले. बंटींचे आभारही मानले. अर्थातंच हे मिशन इमपाॅसिबल होतं. मोदीलाटेत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडूण येणं ही सहजसोपी गोष्ट नव्हती. पण ते बर्याच गोष्टीनी शक्य झालं, त्यात बंटी होते ही मोठी गोष्ट.
*************
तितक्यातंच विधानसभा वाजली. आता पैरा फेडायची पाळी महाडिकांची होती. पण ऐन वेळेला महाडिकांनी दगा केला आणि बंटी पाटीलांच्या विरूद्ध महादेवरावांचा पुत्र अंमल महाडिक हे भाजपाच्या तिकटावर
बंटी पाटलांविरूद्ध उतरले. त्यातंच मोदींची प्रचारसभा कोल्हापूरात झाली. आज जे लोक पैशाची गणितं मांडताहेत त्यांनी आवर्जून वर्षामागंचा काळ आठवावा. यातही महाडिक जिंकले. अंमल महाडिक हे आधीच जिल्हा परिषदेत होते. ती सिट रिकामी झाली, परत तिथल्याही पोटनिवडणुकीत अंमल यांच्याच पत्नी विजयी झाल्या.
आत्ता बघितलं तर महाडिकांच्या घरी पदे किती ???
एक खासदार (राष्ट्रवादी)
एक आमदार (भाजप)
एक आमदार (काँग्रेस)
एक झेड. पी सदस्य(काँग्रेस)
इतकी पद आणि राज्यातली मोठ्ठी दूधसंस्था गोकुळ ताब्यात.
सर्वत्र बंटी पाटील हरलेले. राजकारण एककल्ली वळणावर आलतं. पण वेळोवेळी विश्वासघात झालता पक्षाचा. अनेक लोकांचा. त्यातंच परवा कोल्हापूर मनपा ची ईलेक्शन त्यावेळी ही महाडिकांनी भाजपला जवळ केलं. एका बंटी पाटलानी काँग्रेसचा गड सांभाळला. अर्थात इथंच त्यांनी आजची गणितं आखली होती. मुश्रीफांनीही त्यांच्याशी युती करून पक्ष पैरा फेडला.
ती निवडणुक होते न होते तोच विधानपरिषदेच बिगूल वाजलं. ऊमेदवारी कुणाला यावर बराच खल झाला. यात पी.एन.पाटील, प्रकाश आवाडे इ होते. राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर होते.
बंटीना तिकीट फायनल झालं. पक्षश्रेष्ठीनी कार्याची पोचपावती दिली. ईकडं महाडिक बंडखोर झाले, भाजप आणि सेना सोबतीला होती. अर्ज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीचे यड्रावकरांची मुश्रीफानी समजूत काढली आणि माघार घेतली. महादेवराव तिथंच होते पण त्यांनी मुश्रीफांकडे ढुंकूनही पाहिलं नाही परिणामी मुश्रीफ यांनी बंटीना पाठिंबा दिला इथेच निम्मे फासे फिरले होते. बरीच आर्थिक उलाढाल अपेक्षेप्रमाणे झाली. आणि कोल्हापूरात 100% मतदान झालं. ज्यावेळी मतदान प्रमाणापेक्षा जास्त होतं त्यावेळी प्रस्थापिताला धोका होतो. नेमकं तेच झालं आणि आज बंटी विजयी झाले.
कितीही आर्थिक उलाढाल झाली तरी राजकारण हे राजकारणंच डाव साधता आलं पाहिजे. आणि हे कोल्हापूर आहे.